गेवराई: प्रतिनिधी
साला बादा प्रमाणे याही वर्षी श्रावणमासा निमित्त माऊली ग्रुपच्या वतीने ढाकलगाव, गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व माऊली भक्तांनी दि. १३ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या पायी दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन अंबादास गिरी, जगदाळे, पुजाराम चोरमले आदिनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यातील माऊली ग्रुपच्या वतीने श्रावण महिन्यात गेवराई ते चाकरवाडी पायी दिंडीचे आयोजन केले जात आहे पण यावर्षी अंबड तालुक्यातील ढाकलगाव येथील माऊली भक्तांनी पायी दिंडीत सहभागी झाले आहे त्यामुळे या वर्षी ढाकलगाव येथुन पायी दिंडीला सुरूवात होऊन गेवराई येथील माऊली ग्रुपच्या दिंडीत सहभागी होऊन गढी, पाडळसिंगी, हिरापुर, पेडगाव, बीड, पाली, कपिलधार , मार्गे
चाकरवाडी कडे दिंडीचे प्रयाण होणार आहे त्यामुळे सर्व माऊली भक्तांनी दि. १३ ऑगस्ट रोजी दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन अंबादास गिरी, जगदाळे, पुजाराम चोरमले आदिनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे