जातेगाव! प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील शेतकरी मारोती रामभाऊ चव्हाण यांच्या गावालगत असलेल्या श्रीरामनगर वस्ती शेजारी जातेगांव शिवारातील गट नंबर 267मधील शेतात दि.27 जुलै रोजी रात्री अचानक गोट्याला आग लागल्यामुळे दोन बैल जघमी झाले आहेत व शेती उपयोगी साहित्य जळून शेतकरी यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.रात्री अचानक लागलेल्या आगी मुळे गोट्यात बांधलेले दोन बैल पैकी एक बैल दावे तोडून पळाला मात्र एक बैल या मध्ये सापडला त्यामुळे बैल तीस ते चाळीस टक्के भाजला आहे.या गोठ्यात शेतकरी यांनी शेती उपयोगी साहित्य होते त्या पैकी पीव्हीसी पाईप,दोन फवारे, सायकल, आदी जाळून खाक झाले आहे. गोट्या शेजारी असलेल्या केळीचे झाडे, आंब्याचे झाडाचे सुधा नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी चव्हाण सर, खेत्रे सर यांनी झालेल्या घटनेच्या पंचनामा केला तसेच तलवाडा पोलीस स्टेशन चे जातेगांव बीट अंबलदार श्री.काकडे साहेब,जिकरे सर यांनी सुद्धा सुधा या घटनेचा पंचनामा केला आग कशी लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही मात्र या लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्या मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्या मुळे शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230729-WA0044-1024x769.jpg)