मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील रामेटाळी रस्त्यावर २८ जुलै रोजी अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघा तात सारंगापुर येथील ३१ वर्षीय तरुण रघुनाथ उर्फ सिद्धेश्वर रामकिसन चोखट यांचा मृत्यू झाला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की रघुनाथ उर्फ सिद्धेश्वर रामकिसन चोखट हे शुक्रवारी संध्याकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका हॉटेल वर जेवण करून निघाले असता रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यात त्यांचा मृत्यू झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शव विच्छेदनासाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तरुणानाचा अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.