मातोश्री मुक्ताई धोंडगे यांची 59 वी पुण्यतिथी ठिकठिकाणी उत्साहात साजरी

0
280

नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर

कै. भाई केशवराव जी धोंडगे यांच्या आई मा. मातोश्री मुक्ताई धोंडगे यांची 59 वी पुण्यतिथीनिमित्त कंधार येथील श्री शिवाजी विद्यामंदिर विद्यालय प्राथमिक, माध्यमिक व उर्दू प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली.. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री संभाजी तुकाराम उंद्रटवाड व प्रमुख पाहुणे ऊर्दू विभागाचे मुख्याध्यापक मंजूर अहेमद परदेशी सर तसेच प्राथमिक विभागाचे जेष्ठ शिक्षक श्री भगवानराव शिंदे सर व सौ.निऱ्हाळी साधना रघुनाथ (कुरूडे मॅडम) ह्या ही उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम् गीता पासून झालीं. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रदीप इंगोले सरांनी केलें, त्यांनी मातोश्री मुक्ताई व दिवंगत माजी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, व आमदार, खासदार,भाई डॉ. केशवराव जी धोंडगे यांच्या कर्तृत्वाला सखोलपणे उजाळा दिला. व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, व अनेक विद्यार्थ्यांचीही भाषणं झाली. तसेच सहशिक्षिका सौ कुरूडे यांनी मातोश्रीवर बोलताना म्हणाल्या स्वतः अशिक्षित असुनही भाईंसारखा हिरा घडवण्यासाठी अतोनात कष्ट, मेहनत, घेऊन सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व समाजाला अर्पण केले. तसेच ऊर्दू माध्यमातील सहशिक्षक लायकोद्दीन सरवरी सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पुरस्कार सोहळा पार पडला.
अध्यक्षीय समारोप करताना श्री संभाजी तुकाराम उंद्रटवाड सरांनी पुर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत असणाऱ्या अडचणींवर, सखोल माहिती दिली. व त्या परिस्थितीत मातोश्री मुक्ताईंनी केलेल्या कर्तुत्वावर प्रकार टाकतं म्हणाले, त्या परिस्थितीतही शिक्षण, संस्कृती, संस्कार देऊन संगोपन करणाऱ्या मातोश्री चा आदर्श घेण्यासारखे आहेत असे प्रबोधन केले, व शिक्षण नियंत्रणा,समाजसेवेसाठी आदर्श व्यक्तिमत्व समाजाला बहाल केले असेही सांगितले. एन व्हि भांगे सरांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कासलवार सरांनी केलें, या वेळी संस्थेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व दै. सकाळ पत्रकार हफीज गाडीवाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here