आठवडाभरातच लंम्पि डिसिज आजाराचे दोन बळी
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यात लंम्पि डिसिज चर्मरोगाचे प्रमाण वाढत जात असून याच रोगाने पुन्हा एक बळी घेतला आहे. हमदापुर येथील गेली चार ते पाच दिवसापूर्वीच एका शेतकऱ्याचे गायीचे वासरू लंम्पि डिसिज आजारा ने दगावले होते. हि घटना ताजी असता नाच पुन्हा एक बळी या आजाराने घेतला आहे. अगोदरच शेतकऱ्यावर विविध अस्माणी संकटे कोसळत असून आता शेतकऱ्याच्या पशुधनावर संकटे निर्माण झाली आहेत मानवत तालूक्यातील हमदापूर येथे लंम्पि डिसिज आजाराने पुन्हा शिरकाव केला असून येथील शेतकरी बळीराम विश्वनाथराव शिंदे यांच्या बैलाचा आजराने मृत्यू झाला आहे. दरम्यान काही दिवसापासून त्यांचा बैल आजारी होता व त्यावर वैद्यकिय उपचार हि सुरु होते परंतु. आजाराचे प्रमाण अधिक झाल्याने बैलाच्या शरीरावर पुर्ण गाठी निर्माण झाल्या होत्या आजाराचे प्रमाण अधिक झाल्याने पशु धन बैल दगावला असून शेतकरी बळीराम विश्वनाथराव शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आठवडा भरातच लंम्पि डिसिज आजाराने गावातील दोन जनावरे दगावली असल्यामुळे येथील गावाकऱ्या सह तालुक्यातील शेतकरी व पशु पालकांमध्ये एक प्रकारे चिंतेचे वातावरण पसरले आहे तरी संबंधित विभागाने यावर तात्काळ उपाय योजना करुन योग्य ती ठोस पावले उचलावीत अशी मागणी शेतकरी व पशुपालकांतुन केल्या जात आहे. तसेच आठवडा भरातच दोन जानावरे या आजाराने दगावली असल्यामुळे मानवत तालूक्यातील शेतकरी व पशु पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पशुपालक शेतकर्यामधून होत आहे.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/07/IMG-20230727-WA0055-1024x1022.jpg)