गेवराई प्रतिनिधी
मी अजित काळे, चेअरमन श्रीमंत योगी निधी बॅंन्क लिमिटेड गेवराई जिल्हा बीड.
जाहीर खुलासा करतो की, माझ्या. बॅंन्केतील एफ.डी धारकां च्या ठेवीची बहुतांश वाटप केलेली आहे केवळ 68 लोकांच्या ठेवीदारांचे वाटप चालू आहे. 1 कोटी,19 लाख रुपयांचे वाटप बाकी आहे.ते लवकरच पुर्ण केले जाईल ते राहीलेले वाटप 5/8/2023 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत करण्यात येत आहे.काही लोकांनी गैरसमजातून पेपर मध्ये न्यूज देण्याचा प्रयत्न केला आहे.काही तांत्रिक कारणांमुळे मुळे राहीलेली वाटप येत्या पाच ऑगस्ट पर्यंत कोणत्याही परिस्थितीत करण्यात येईल.याची नोंद घ्यावी राहीलेल्या ठेवीदारांना नम्र विनंती कि, आपण आतापर्यंत मोलाचे सहकार्य केले आहे आता केवळ काही दिवसांतच सर्वांची रक्कम मिळुन जाईल.मी अजित काळे, चेअरमन सर्वांच्या कायम संपर्कात आहे.व पुढेही राहील.लोकांनी पेपर मधील अफवांना वा चुकीच्या वार्तांना महत्व न देता सहकार्य करावे.47 लोकांचे वाटप याच टप्प्यात होईल..मी प्रत्येकाची ठेव 100% अदा करणार आहे सर्वांनी निर्धास्त रहावे.अकारण न्यायीक व केसेसच्या प्रकरणात पडुन नये हि विनंती.
आपलाच
अजित चंद्रकांत काळे
चेअरमन
श्रीमंत योगी निधी बॅंन्क गेवराई जि.बीड