आष्टी प्रतिनिधी
मौजे वाहली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,आरोग्य सहाय्यक शांतिनाथ बाबुराव देशमुख यांचा दिनांक 22 जुलै 2023 रोजी ठीक अकरा वाजता आष्टी येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय,खडकत रोड येथे ठीक अकरा वाजता सेवापूर्ती निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.गोरोबा काका कुंभार बचत गट आणि आष्टी तालुका कुंभार संघ यांच्यावतीने या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शांतिननाथ बाबुराव देशमुख यांनी जिल्हा हिवताप कार्यालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सहाय्यक या पदावर निष्ठेने काम केले आहे.त्या सेवेला दिनांक 30 जून रोजी तीस वर्ष पूर्ण झाले आहेत.आष्टी येथील भूमिपुत्र असलेल्या शांतिनाथ बाबुराव देशमुख यांच्या कार्याची प्रशंसा केवळ कार्यालयीन क्षेत्रातच नव्हे तर ग्रामीण भागातील आरोग्य संबंधीच्या समस्या,अडाणी,अशिक्षित समाजाला सांगून त्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे.आरोग्य सेवा एक महत्त्वाची सेवा मानली जाते.त्यात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी विद्यमान आमदार सुरेश आण्णा धस,आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ. साहेबराव दरेकर,नगराध्यक्ष मिर्झा झिया बेग,डॉ.मधुकर हंबर्डे,डॉ.गणेश पिसाळ, चंद्रभान देशमुख,भोंडवे मॅडम,ह.भ.प.डोरले महाराज,बाजार समितीचे संचालक अशोक पवार,आप्त,स्नेही,त्यांचे सर्व सहकारी,पंचक्रोशीतील शांतिनाथ बाबुराव देशमुख यांच्यावर प्रेम करणारे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.