आधिक मासानिमित्त सोमाणी परिवाराचा स्तुत्य व सामाजिक उपक्रम
गेवराई :
रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालय गेवराई येथे आधिक मासानिमित्त शनिवार दि.२२ जुलै रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून सोमाणी परिवार व महिला मंडळाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांसह मिष्टान्न भोजन देण्यात आले.
सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे. १८ जुलैपासून सुरु झालेला अधिक श्रावण महिना १६ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. अधिक महिना शुभ-फलदायी मानला जातो.आधिक मासामध्ये दानधर्म तसेच अन्नदानाला विशेष महत्त्व आहे याचे औचित्य साधून सोमाणी परिवार तसेच महिला मंडळ यांच्याकडून गेवराई येथे दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह मिष्टान्न भोजन देण्यात आले. यावेळी शारदा सोमाणी, अलका तोष्णीवाल, बेबी सोमाणी, अंजली बलदवा, निर्मला झंवर, पुजा सोमाणी, कोमल सोमाणी, पुजा बलदवा, राधिका झंवर यांच्या सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच दिव्यांग विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.