उमापूर : प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबुराव कापसे यांचे चिरंजीव राजू शंकर कापसे याचे गुरूवार ता. 20 रोजी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले.
रविवार ता. 15 जूलै रोजी तो दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाला होता. सदरील अपघात पुणे जिल्ह्य़ातील सासवड रोडवर घडला. त्याच्यावर सासवड येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात येऊन, पुढील उपचारार्थ पुण्यातील नोबेल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी राजुला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पाच दिवस त्याने मृत्युशी झुंज दिली. गुरूवार ता. 20 रोजी पहाटे वाय. सी. एम. सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता उमापूर ता. गेवराई येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते. राजू कापसे याच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.