नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
पेरणी योग्य पावसाअभावी आधीच कपाशी पिकांची उगवण शक्ती कमी प्रमाणात होऊन त्यात उडीद, सोयाबीन या पिकांची वाढ खुंटली असून त्यातच कसेबसे तग धरून असलेल्या कपाशी व सोयाबीन या पिकांनी बाळसे धरण्या आधीच गोगलगायींनी विळखा घालून पिके कुरतडण्याचा प्रताप सुरू केल्याने, या गोगलगायींच्या उपद्रव्यापाने शेतकरी मात्र त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी वेळेवर पेरणीयोग्य पाऊस पडला नसल्याने पावसाची प्रतीक्षा करत काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विहीर व विंधन विहिरीतील पाणी साठ्याचा आधार घेऊन ठिबक सिंचन व सरी भिजून पट्टा पद्धतीने कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली, तशी कापसाची रोपे पण जमिनीच्या वर डोके काढण्याच्या अवस्थेत असतानाच या छोट्या-छोट्या पिकांना गोगलगायींनी विळखा घालून पिक बाळसे धरण्या अगोदरच पाने कुरतडून कपाशी पिकाबरोबरच मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे.
गोगलगायींना नष्ट करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या औषधी द्रव्यांचे मुरमुऱ्यामध्ये मिश्रण करून शेतामध्ये शिंपडत असल्याचे दिसून जर येतं आहे. तरी PI Company che Snail Kill हे औषधं 100% प्रभावी दिसुन येते आहे.अगोदरच पेरणी योग्य पावसाचा अभाव आणि त्यात गोगलगायीं चा उपद्व्याप यामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.