गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील चिखली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात करुन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रतिष्ठित नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, पालकांसह शिक्षक बांधव तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील चिखली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव व ग्रामपंचायत ऑपरेटर रवि तुरुकमारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त सामाजिक कार्यकर्ते सुलेमान शेख यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही,पेन, पुस्तक यासह विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपसरपंच बाळू वारे, ग्रा.पं.सदस्य वशिष्ठ परमेश्वरराव काळे पाटील, साईनाथ सुरवसे, सुनील औटे, बबन काळे, बाबासाहेब तुरुकमारे, संतोष वारे, रमेश वारे, जालिंदर वारे, आदिनाथ माळी, पंढरीनाथ माळी,रामकिसन वारे,भरत ठोसर, संदीप ठोसर, सुदाम वारे, राधाकिसन शिंदे, रमेश शिंदे, प्रल्हाद ठोसर, गहिनीनाथ शिंदे, सोमेश्वर जरांगे, सर्वोत्तम वारे, मनोहर वारे, सुरेश एकशिंगे, आबासाहेब तुरुकमारे,मोहीन सय्यद, संदीप गवते, शाळेचे शिक्षक कैलास सपकाळ यांच्या सह आदि पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.