गेवराई ( प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील श्री.सावता मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अरण ते बंगाली पिंपळा पायी ज्योत आणण्यात येणार असून येथील तरुण 14 जुलै रोजी अरणकडे प्रस्थान झाले आहे.
आयोजित समितीच्या वतीने अकरा वर्षापासून सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अरण ते बंगालीपिंपळा या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले.ज्योत आणण्यासाठी शुक्रवार 14 जुलै रोजी बंगाली पिंपळा येथील तरुण अरण होऊन पायी ज्योत आणण्यासाठी रवाना झाले आहेत.