आष्टी प्रतिनिधी
महाविद्यालयाच्या उत्कर्षात सर्वांचाच खारीचा वाटा आहे.देविदास गांधले यांनी वरिष्ठ लिपिक पदावर काम करताना,कामात कसूर केला नाही.आपल्या वाट्याला आलेले काम त्यांनी चोख बजावले.आपल्या 32 वर्षाच्या सेवेत कार्यालयीन दस्तावेजाच्या पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांशी थेट संपर्क येतो,तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांची अडचण आत्मीयतेने समजून घेतली.पुन्हा ज्या ज्या वेळेस त्यांची महाविद्यालयाला गरज भासेल त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा राहील.देविदास गांधले यांनी वरिष्ठ लिपिक पदावर असताना निष्ठेने सेवा केली.असे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक देविदास गांधले यांच्या 32 वर्षाच्या सेवापुर्ती निमित्त, सेवा गौरव सोहळ्याचे अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते.यावेळी सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,तय्यब शेठ, प्रा.महेश चौरे,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.प्रारंभी प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,प्रा.रामकृष्ण हंबर्डे,डॉ.बाबासाहेब मुटकुळे,प्रा.ज्ञानेश्वर नवले,माने मॅडम,चिरंजीव गांधले यांनी मनोगत व्यक्त केले.तदनंतर श्री देविदास गांधले व सौ.भारती गांधले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.श्री.देविदास गांदले यांनी सत्काराला उत्तर दिले.यावेळी प्रा.वसंत देशमुख,माणिकराव लगड,लक्ष्मण रेडेकर,दत्तोबा आजवे,गोविंद राठोड,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन तसेच उपप्राचार्य अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे,प्रा.सायली हंबर्डे यांनी केले.प्रा.सचिन कल्याणकर यांनी आभार मानले.