कासारी,मुर्शदपुर,शिदेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी                                  

0
82

आष्टी प्रतिनिधी  

आष्टी तालुक्यातील कासारी,मुर्शदपुर, शिदेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात विद्यमान सरपंच सौ.शालन अशोक मुळे,ग्रामसेवक बी.ए.जगताप,माजी पंचायत समिती सदस्य श्री अशोक पांडुरंग मुळे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,संतोष जिजाबा कदम,आदेश नितीन निमोणकर,अक्षय राजेंद्र हाळपावत, कपिल आग्रवाल,मनोज धनवडे,सचिन बापूराव नालकोल,शरद सोमीनाथ धनवडे,मधुकर सर्जेराव लोखंडे,अमोल दरेकर,सदाशिव विश्वनाथ अष्टेकर,ईश्वर भीमराव भोगाडे,संदीप नवनाथ,सचिन शिवाजी काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक क्रांतीचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.सरपंच सौ.शालन अशोक मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.छत्रपती शाहू महाराजांनी सकल समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत,शेवटच्या माणसापर्यंत विकास आणि शिक्षण पोहोचले पाहिजे,यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आपण कधीच विसरू शकणार नाहीत.त्यांची शिकवण आचरणात आणण्याची आज गरज आहे.असे यावेळी प्रमुख वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here