पांडुरंगाच्या भेटीची ओढ वारकऱ्यांना असते हा यंदा सुखसोहळा सुरू झाला आहे. वारकरी भक्ति-रसात चिंब आहेत. हा आनंद कोठेही मिळत नाही. तो घरी बसून मिळत नाही. टीव्हीवर बघून मिळत नाही. तो प्रत्यक्ष अनुभूती घेतल्यावरच कळतो. वारीतील सुख सांगायला शब्द कमी पडतात. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीने उतावीळ होत वारकरी त्यांचेच गुणगान गात पंढरीची वारी करतो. त्यातून आत्मिक सुख अनुभवतो. वारीत स्त्री-पुरुष समानता दिसते. स्त्री असो वा पुरुष इथे एकमेकांना माउली म्हणून संबोधले जाते.दिंडीत तुळशीधारक
महिला मंडळी पण वारकऱ्यांप्रमाणे त्यांना वर्षभरासाठी प्रचंड ऊर्जा मिळते.आषाढी वारीत नादब्रह्माचा आनंद इतका असतो, की पुढे वर्षभर जगण्यासाठी आणि उभारी घेण्यासाठी आत्मबळ मिळते.मनासारखी वारी होते. जात-पंथाचा भेदाभेद न पाळता वारी होत असते. पैसा सर्व काही देऊ शकत नाही. मात्र, वारीमध्ये आत्मिक सुख मिळते. वारीत एखादी व्यक्ती नव्याने सहभागी झाली तर तिला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. एखादी व्यक्ती आजारी असल्याससहकार्य केले जाते. वारकऱ्यांत एकमेकांबद्दल आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम भावना असते.महिला-पुरुष वारकरी संप्रदाय सगळीकडे जमेल त्या ठिकाणी म्हणजे रिंगण असो, तिथे उपस्थित भक्तांच्या टाळांच्या उड्या चालू असतील तर महिला-पुरुष वारकरी मंडळी फुगड्या खेळतात.. यंदा या भक्तिरसात चिंब होत वारी होते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. हा आनंद कोठेही मिळत नाही. तो घरी बसून मिळत नाही. टीव्हीवर बघून मिळत नाही. तो प्रत्यक्ष अनुभूती घेतच घेतला पाहिजे. तरच त्या आनंदाची खरी प्रचिती येत असते. याच आनंदासाठी लाखो भाविक पंढरीची वारी करीत आहेत. वारीच्या आनंद सांगायला शब्द कमी पडतात. वारीचे सुख खूप छान आहेत. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीने उतावीळ होत वारकरी त्यांचे गुणगान गात वारी करतो. त्यातून अध्यात्मिक वसा जोपासून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल असे रुप अनुभवता येते.
लेखक आरती अनिल म्हेत्रे
वर्ग -दहावी
शाळा -चिंतेश्वर विद्यालय, गेवराई