तहसीलदार संदीप खोमणे यांची वाळू माफियामध्ये दहशत

0
90

एका हायवा सोबत बावीस लाखाचा मुद्देमाल जप्त

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाळू माफियायांच्या नांग्या ठेचाला सुरुवात केली आहे. एक हवा पकडून 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दररोज गोदापट्ट्या जात असल्याने वाळूमाफियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे हे त्यांच्या टीमसह दररोज वाळू माफियांना पकडण्यासाठी गोदापट्ट्यात चक्कर मारत असतात अशीच चक्कर मारताना दि. 21 बुधवार रोजी सकाळी 8 वा. उमापूर चकलांबा रोडवरती अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा तहसीलदार खोमणे यांना दिसताच त्या हायवाला पकडून गेवराई येथील डेपो मध्ये लावण्यात आला. ही कारवाई करताना तहसीलदार संदीप खोमणे यांच्या सोबत पथकातील सदस्य मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ, बाळासाहेब पकाली तलाठी किरण दांडगे, ढोले, अमोल कोंढरे, ठाकूर कोतवाल, शुभम गायकवाड व गजानन शिंगणे सोबत होते. या कारवाईत हायवा सह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोदापट्ट्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाळू माफियांत तहसीलदार खोमणे यांची दहशत निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here