गिरीराज जिनिंगला आग, २८ लाखाचे नूकसान

0
397

गेवराई, प्रतिनिधी

येथील रोहीतळ रोडवर असलेल्या गिरीराज जिनिंगला अचानक आग लागुन तब्बल २८ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. पाऊस नसल्साने उन्हाची तिव्रता अजूनही कायम असून या घटनेत जिवीत हानी टळली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहीतळ रोडवरील गेवराई याठीकाणी गिरिराज या नावानं जिनिंग व प्रेसिंग आहे. मंगळवारी भर दुपारी अचानकपणे या जिनिंग ला आग लागल्याने कापसाच्या गठाणसह इतरत्र आग लागली. याठिकाणी स्थिती लक्षात घेता तब्बल २८ लाख रुपयाचे नुकसान झाल्याची नोंद गेवराई पोलीस डायरीत करण्यात आली. नागेश शिवकुमार मानूरकर यांनी दिलेल्या खबरीरुन जिनिंग मध्ये काम चालु असताना ही आग लागल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान येथील कामगार व अग्निशमन च्या सहाय्याने ही आग आटोक्यात आल्याने अधिकचे नूकसान टळले, याकामी गेवराई पोलीस डायरीत नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here