गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युती सरकारच्या वतीने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभार्त्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात येणार असून या शासकीय योजनांची माहिती व लाभ घेण्यासाठी गेवराई विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. लक्ष्मण पवार यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध लाभदायी योजना राबवण्यात येत असून या योजनेचा लाभ गफमीन भागात तळागाळातील नागरिकांपर्यंत गेला पाहिजे यासाठी दि.24 जुन रोजी सकाळी 11 वा.
बायपास जवळील गोदावरी हॉल येथे भव्य शासन आपल्या दारी या भव्य कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरकुल योजना, जलसिंचन विहीर, नरेगा अंतर्गत शेत तलाव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन, उसतोड कामगार ओळख पत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, घरगुती विज जोडणी, ना हरकत, निराधार आसल्यांचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्या बाबत, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, सातबारा आठ अ वाटप, दारीद्ररेषेचे प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक वाटप, बचत गटांना कर्ज वाटप, दिव्यांना जीवनावश्यक वस्तुसाठी अनुदान, स्वच्छ भारत मिशन वैयक्तिक शौचालय अनुदान, विशेष घटक योजना गाय गट, शेळी गट, संजयगाधी, निराधार, श्रावणबाळ, निवडणूक ओळखपत्र, संकीर्ण (उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र), पि. एम. किसान, आधार आपडेट, आदि योजने संदर्भात योग्य ती माहिती देण्यासाठी विविध दाखल्यांचे व मंजुरी पत्राचे वाटप करण्यासाठी आ. लक्ष्मण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. दरम्यान कार्यक्रम स्थळी नागरिकांसाठी वरील सर्व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय स्टाॅल उभारण्यात येणार आसून यातून सर्व लाभार्थींना प्रत्येक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. लक्ष्मण पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.