जिल्हा वक्फ कार्यालय समोर आमरण उपोषण करू – सय्यद सलीम बापू
बीड / प्रतिनिधी
धारूर येथील ऐतिहासिक शहीद मुगलानी मशिद ची पुन्हा तामिर करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हा वक्फ कार्यालय येथे आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने सय्यद सलीम बापू ( मराठवाडा सचिव ) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर असे की,धारूर तालुक्यातील सर्व्हे नं. ५५६, ६१० मध्ये ऐतिहासीक शहिद मोगलानी मशिद होती परंतू ती शहिद झालेली आहे.जेंव्हा ती शहिद झाली ती आता पर्यंत तामिर करण्यात आलेली नाही. ती मशिद आतापर्यंत का तामीर करण्यात आलेली नाही. वरील मशिदीची जागा ज्याठिकाणी होती त्या जागेचे काय झाले ? ती जागा आतापर्यंत मशिदीची असल्यामुळे ती धारूर येथे आहे व त्या जमीनीवर आतापर्यंत परत मशिद तामीर करण्यात आलेली नाही. तसेच वरील मशिदीची नोंद खासरा पत्रक, पाणी पत्रक तसेच नमुना नं. ९, मुन्तखबनामा असतांना वरील मशिद कोठे गेली याची जायमोक्यावर जावून पंचनामा करण्यात यावा.
धारुर येथील काही भूमाफिया, राजकारणी लोक तसेच महसूल अधिकारी यांच्या संगनमताने वरील मशिदीस तामीर करण्यास हस्तक्षेप केलेला असे दिसून येते. तसेच आपण देखील मशिद तामीर करण्या बाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही तसेच वरील मशिदी बाबत जायमोक्यावर जावून मशिद शहिद झाल्याबबत पंचनामा देखील केलेला नाही. वरील मिळकत ही आपल्या अधिकारामध्ये येते व वरील मशिद तामीर करण्याचा आपणास तामीर करण्याचा हक्का व अधिकार आहे. परंतू आपण देखील धारुर येथील काही राजकारणी लोकांशी व तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांशी संगणमत करुन आतापर्यंत ऐतिहासीक मोगलानी मशिद तामीर केलेली नाही.
आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, आपण वरील ऐतिहासीक शहिद मोगलानी मशिद त्याच जागेवर परत तामीर करण्यात यावी नसता आपल्या कार्यालयासमोर दि. १४/०६/२०२३ रोजी अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे माजलगाव येथील माजी नगरसेवक तथा समाजसेवक सय्यद सलीम बापू यांनी जिल्हा वक्फ कार्यालय येथे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
वरील बातमी ही आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात यावी ही नम्र विनंती.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230613-WA0038.jpg)