डॉ.सय्यद दातांच्या दवाखान्यामुळे आष्टीच्या आरोग्य सुविधेत भर : मा.आ.साहेबराव दरेकर                                  

0
224

आष्टी प्रतिनिधी 

आज लोकसंख्येचा विचार करता जितकी आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे,दुर्दैवाने ती होत नाही.पूर्वी लोक आरोग्याची फारशी काळजी करत नव्हते.परंतु कसदार आहारामुळे त्यांचे आरोग्य मजबूत असायचे.परंतु काळ बदलला,आज आहारही कसदार राहिला नाही आणि लोक गुटखा पुड्यांच्या आहारी गेले.त्यामुळे प्रामुख्याने दातांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला.तीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात शरीराच्या अन्य अवयवावर सुद्धा दिसून येते.एका विशिष्ट वयानंतर दातांची काळजी घेतली नाही तर शरीरावर त्याचे दुर्गामी परिणाम होतात.डॉ.सय्यद हुमायुद्दीनच्या डॉ.सय्यद दातांच्या दवाखान्यामुळे आष्टीच्या आरोग्य सुविधेत भर पडेल.असे मा.आ.साहेबराव दरेकर नाना म्हणाले.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे चिरंजीव डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांच्या डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी मा.आ.भीमराव धोंडे, आ.बाळासाहेब आजबे,युवा नेते जयदत्त धस,डॉ.मधुकर हंबर्डे,अनंत हंबर्डे,डॉ.विलास सोनवणे,डॉ राहुल टेकाडे,डॉ.अब्दुल मुजाहिद,डॉ.रासकर,डॉ.बनसोडे,डॉ. नाथ, डॉ.समीर पठाण,डॉ.अजहर बेग,नामदेव भाऊ राऊत,आजिनाथ सानप,रंगनाथ अण्णा धोंडे,विजयकुमार गोल्हार,अशोक मुळे,हाजी हारून शेठ,अतुल शेठ मेहर,सुखलाल मुथा,सुयोग वाजे,मेहेर शेठ सराफ,सिताराम पोकळे,सय्यद ताहेर जमाल,कृष्णा देशपांडे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,अविनाश कदम,अब्दुल मुजाहिद,रत्नदीप निकाळजे,लईक शेठ काजी,संजय शेठ मेहर,डॉ.खान,राधाकिसन पोकळे,गणपत पोकळे,जालिंदर पोकळे,शेख शरीफ,अनिल जगदाळे,डॉ.नदीम,पंडित कल्याण पोकळे,भाऊसाहेब तावरे,लक्ष्मण रेडेकर,भाऊसाहेब निंबाळकर,शेख इस्माईल,तात्यासाहेब शेंडगे,संजय शिंगवी,मधुकर सोळसे,सय्यद हबीब हुसेन,वाहेद पठाण अशा अनेक मान्यवरांनी उद्घाटनाला हजेरी लावली.सूत्रसंचालन डॉ.अभय शिंदे,संतोष दाणी,कवी हरीश हातवटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here