गेवराई प्रतिनिधी
गेवराई येथील विश्वकर्मा वंशिय समाज संघटन महाराष्ट्र राज्य, गेवराई युवा तालुक्यातील नुतण युवा कार्यकारणी निवड करण्यात. आली गेवराई तालुका युवा अध्यक्ष किशोर वाघमारे उप अध्यक्ष नवनाथ सांगुळे सचिव श्रीहरी गायकवाड सहसचिव सतीष सावंत कार्याध्यक्ष अक्षय गायकवाड कोषअध्यक्ष सुनील सागळे सहसंघटक नंदु शिंदे सल्लागार महेश नन्नवरे तर जिहा अध्यक्षपदी राजेंद्र पंडित यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
गेवराई शासकीय विश्रामगृह येथे विश्वकर्मा वंशीय समाज संघटना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ यांच्या आदेशानुसार गेवराई तालुका अध्यक्ष अशोक (नाना) गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वकर्मा वंशिय समाज संघटन चे महाराष्ट्र राज्य सचिव मा. दिलीप सोनवणे व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. रविजी चन्नैकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठक संपन्न झाली यावेळी शिवाजी झेंडेकर सर अनिल गायकवाड लहु सोनवणे केशव पंडित पत्रकार उबाळे अभिषेक गायकवाड बाळू पांचाळ लक्ष्मण काशीद बाळासाहेब गायकवाड सचिन सोनवणे गणेश पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते
गेवराई तालुका नुतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी तालुक्यातील विश्वकर्मा समाजातील सुतार, लोहार, सोनार समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने होते या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230610-WA0028.jpg)