शिरूर प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर,किरण नाईक सर,परिषदेचे प्रदेश अध्यक्ष शरद पाबळे सर यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी शिरूर कासार तालुकाध्यक्ष पदी जालिंदर नन्नवरे
यांची निवड केली तर कार्याध्यक्ष पदी अशोक भांडेकर,तर सरचिटणीस पदी गोरख खेडकर यांची निवड जाहीर केली.
या निवडीबद्दल त्यांचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर , राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन,विभागीय समन्वयक सुभाष चवरे,जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे, जिल्हा कार्याध्यक्ष सतीश बियाणी,जिल्हा कोषाध्यक्ष छगन मुळे,हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष साहस अदोडे,माजी जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे,माजी जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता आंबेकर,उपाध्यक्ष चंद्रकांत राजहंस ज्येष्ठ पत्रकार बबनराव देशमुख, विजयकुमार गाडेकर, नगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके,शंकर भालेकर, धर्मराज जरांगे, गोकुळ भुसारे, अशोक कानगावकर आदींनी अभिनंदन केले आहे.