चंद्रपूर प्रतिनिधी
चिमूर(चंद्रपूर) : चिमुर तालुक्यातील नेरी येथील ग्राम पंचायत कार्यालया समोर असलेल्या माही हेअर सलुनचे मालक अनिल शालिकराम बारसागडे वय ४० वर्षे यांनी आपल्या दुकानात संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास गळफास लावुन आपली जिवन यात्रा संपवली.
या घटनेबाबत सविस्तर माहिती असे की, नेरी येथील सलून व्यावसायिक अनिल बायसागळे हे नेहमी प्रमाणे आपल्या दुकानात गेले होते. ते दुपारी नेहमीच घरी जायचे.
मात्र आज बाबा घरी का आले नाही म्हणून त्यांच्या मुलाने दुकानाकडे जाऊन बघितलं असता अनिल बारसागडे हे दुकानात गळफास लावुन दिसले. याची घटनेची माहिती मुलाने लागलीच इतरांना सगितली व ही बातमी वाऱ्यासारखी नेरी व परिसरात पोहचली आणि नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली.
सदर मृतकाने आत्महत्या का केली याबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नसून सदर बारसागडे हे १० वर्षांपासून नेरी येथे वास्तव्यास आले होते. ते सावली तालुक्यातील निमगाव निपन्द्रा येथील मूळचे रहिवासी होते.सदर सलून व्यवसायिक याने कर्जाच्या बोजाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीएसआय सोनुने, बुट्टे पोलीस शिपाई, गोणाडे .यांनी प्रेताचे पंचनामा करून उत्तरनिय तपासणीसाठी चिमुरला रवानगी केली मुतकाच्या मागे पत्नी दोन लहान मुले असा आप्त परिवार आहे. पुढील तपास चिमूर ठाणेदार गभने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनुने करीत आहेत.
दरम्यान या घटनेची दखल स्थानिक समाज संघटनेने आणि सलून संघटनेने घेतली असून या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
सदर दुर्दैवी घटनेची दखल राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे उपाध्यक्ष संजय पंडित यांनी घेतली असून सरकार ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या पाठी खंबीर पने उभे राहून प्रत्येक अडचणीत त्यांच्या मदतीला धाऊन येते,त्याच प्रकारे सरकारने सेवादानाचे कार्य करणाऱ्या सलून व्यवसायिकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
राज्यातील सलून व्यवसायिक वाढत्या महागाई मुळे पूर्णपणे डबघाईला आलेला आहे,दिवसेंदिवस सावकारी कर्जाच्या ओझ्याने व्यवसायिकांना व्यवसाय करणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होऊन बसले आहे.
कोरोना काळात व्यवसाय बंद आणि इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने जवळ जवळ ४२ सलून व्यवसायिकांनी आर्थिक टंचाईला त्रासून आपली जीवनयात्रा संपविली.त्यांचे कुटुंबीय अजूनही सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
सेवा दानाचे कार्य करणाऱ्या राज्यातील तमाम सलून व्यवसायिकांच्या आर्थिक मदतीसाठी सरकारने तात्काळ योग्य ती मदतीची पावले उचलावी आणि राज्यातील बळीराजा प्रमाणे सलून व्यवसायिकांनाही आर्थिक कोंडीतून बाहेर काढावे अशी मागणी राज्यातील विविध संघटना,नाभिक महामंडळ आणि राष्ट्रीय जनसेवा पक्षा द्वारे करण्यात येत आहे.