मादळमोही
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहीमाता विद्यालयाचा निकाल 99.99% टक्के लागला या यशा बद्दल सर्वत्र गुणवंत विदयार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येते आहे.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता शाळेतील इयत्ता 10 वी वर्गाचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला. या निकाला मध्ये दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी निकाची यशाची परंपरा कायम ठेवत एकूण निकाल 99.99% टक्के लागला. शाळेतून प्रथम क्रमांक कु. प्रणिता रामेश्वर भोसले गुण 92.60%, दुसरा क्रमांक कु. गायत्री अशोकराव मोहिते गुण 91.40% तर तिसरा क्रमांक चि. शुभम रामेश्वर सोलाट गुण 90.60% हे विशेष प्रविण्यासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मोहिमाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण गोडसे, सचिव पद्माकर सरपते, मुख्याध्यापक मिसळ बी. यू.,पर्यवेक्षक वाजे आर. ए. सर्व शिक्षक शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आहे.