गेवराई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ,औरंगाबाद विभागाच्या वतीने मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून प.पु.गुरू गणपत बाबा शिक्षण प्रसारक मंडळ,संचलित रामेश्वर विद्यालय,सिंदखेड चा निकाल 100% इतका लागला आहे. विद्यालयाने दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयामधून कु.औटे अदिती सतिश 89.00 % प्रथम, कु.वखरे क्रांती दादासाहेब 86.20% दृतीय, चि. ठोसर कार्तिक शेषेराव 86.20% दृतीय, कु.जाधव नियती भीष्मां 83.40 % तृतीय आले आहे.विशेष प्रविण्यसह 30, प्रथम श्रेणीत 15,दृतीय श्रेणीत 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शाळेचे सचिव/मुख्याध्यापक श्री.संभाजी दादा करांडे सर व सर्व शिक्षकांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या