गेवराई ( प्रतिनिधी )
कोरोना काळात केलेले सामाजिक कार्य तसेच गरजू महिलांना पतसंस्थाच्या मार्फत करण्यात येणारी मदत हे सर्व सामाजिक कार्य पाहता जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने ” राष्ट्रीय नवरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, या पुरस्काराचे वितरण रविवार दि.4 रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट (कॉलेज) कोर्टी -पंढरपुर या ठिकाणी होणार आहे.
देशात कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन झाले होते. या लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकां पासून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. अशा कोरोना महामारीच्या परिस्थितीत गेवराई येथील जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के हे सर्व सामान्य व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले व गेवराई तालुक्यातील गुंतेगाव, कटचिंचोली व लुखामसला या गोदावरी नदी पट्टयावरील व उजव्या कालवा जाणाऱ्या या तीन गावातील शेतकऱ्यांचे कोरोना परिस्थित उत्पन्न वाढीसाठी हातभार लागावा या हेतूने या भागातील 30 शेतकऱ्यांना पशुधन खरेदीसाठी जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाने 50 लाख रूपयांचे अर्थ साहाय्य केले. तसेच कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी व माहामारीला हद्दपार करण्यासाठी जगदंबा महिला सहकारी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांनी सामाजिक जाणिवेतुन संस्थेच्या वतीने मुख्यमंञी साहयता निधीसाठी ३१००० दिले. त्यांच प्रमाणे कोरोना या विषाणुजन्य परिस्थितीत ही पतसंस्थेने मदतीचा हात पुढे करून बाला ग्राम येथील अनाथ मुलांना किराणा साहित्य दिले त्याच प्रमाणे दहा गरजवंत विधवा महिला शोधून त्या महिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी प्रति महिना दोन हजार रूपये या प्रमाणे 24 हजार रुपयांचा पतसंस्थेकडून देण्यात आले. जगदंबा महिला नागरी सहकारी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष शिवनाथ मस्के यांचे हे सामाजिक कार्य पाहता मस्के यांना महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने ” राष्ट्रीय नवरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे पत्र देण्यात आले असून हा पुरस्कार कुटुंबातील सर्व सदस्य समवेत रविवार दि.4 रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट (कॉलेज) कोर्टी -पंढरपुर या ठिकाणी देण्यात येणार आहे. शिवनाथ मस्के यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.