गेवराई (शुभम घोडके) शैक्षणिक कारकिर्दीत पहिला टप्पा पार करण्यासाठी दहावी हा महत्त्वाचा टप्पा असतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
SSC परीक्षेचा निकाल मार्च-2023मध्ये घेण्यात आलेल्या दहावी च्या परीक्षेत विमला माध्यमिक विद्यालय, गेवराई येथे दहावीत शिकत असलेली गायत्री अनिल म्हेत्रे हिने एकुण 500पैकी409 गुण मिळवून उत्कृष्ट असे यश मिळवले.
आई-वडिलांचे कष्ट पाहता तिने अभ्यासात स्वतःला झोकून दिले. कोणताही खासगी क्लास न लावता ती अभ्यास करत राहिली गायत्री ने आई-वडिलांच्या कष्टाला यशाचे तोरण बांधले असून दहावीच्या परीक्षेत 81.80 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली.दहावीच्या अभ्यासात कठोर मेहनत घेतलीय. तिने 81.80 टक्के गुण मिळवून विमला विद्यालयाच्या यशोलौकिकात आज भर घातली.अभ्यास व घरकाम यांचा सुरेख मेळ साधत यश कसे मिळवता येते, याची झलक तिनें दाखवून दिली आहे अभ्यासाचे योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमातून तिने 81.80 टक्क्यांसह परीक्षेत यश प्राप्त केले त्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.