औरंगाबाद (प्रतिनिधी) सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने निळे प्रतीक या वृत्तपत्राचे संपादक,तथा एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांना सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने दिलेला, प्रतिष्ठेचा समजला जाणारा, समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. रतनकुमार साळवे यांच्या कार्याची वेळोवेळी समाजाने दखल घेतली आहे.आतापर्यंत त्यांना विविध संस्था, संघटनाच्या वतीने ३५ पुरस्कार मिळालेले आहे.यामध्ये राज्यस्तरीय ५पुरस्कार आहेत. तें गेल्या २० वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कामाची चुनक आपल्याला प्रकर्षाने बघायला मिळते. तें एडिटर अँड प्रेस रिपोर्टर असोसिएशन अध्यक्ष आहेत. त्यामुळे सर्वसामान्यसोबतच पत्रकारांचे प्रश्न देखील तें हिरीरीने सोडवत असतात. सामाजिक कार्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी ठसा उमटवलेला आहे.तें तीन विषयात पोस्ट ग्रॅज्युट असल्यामुळे समाजाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. आपल्या निळे प्रतीक या वृत्त पत्रातून तें वंचित, पिढीत घटकाला सातत्याने न्याय देत असतात.अन्याय अत्याचारला वाचा फोडत असतात.समाजसेवा, आपण समाजाचे काही देणं लागतो हा विचार समोर ठेवून त्यांचे कार्य सुरु आहे.निळे प्रतीक बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत तें समाज उपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करत असतात.कोरोना काळात लॉक डाऊन असताना त्यांचे कार्य हे उल्लेखनीय असेच आहे. त्यांच्या एकूणच कार्याची दखल घेऊन त्यांना प्रो.शरद बाविस्कर ( जवाहरलाल नेहरू विद्यालय, नवी दिल्ली ) यांच्या हस्ते रविवारी औरंगाबाद मध्ये समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने सर्वं स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे. या कार्यक्रप्रसंगी सिद्धार्थ मित्र मंडळाचे अध्यक्ष,प्रकाश कांबळे, प्रा. किसन चव्हाण, सुधाकर मेश्राम, एम.एन.ढाकरगे, डॉ. संदेश भित्रे, एन. डी. जिवणे,एल एस.कांबळे, एस के. कांबळे आदीची उपस्थिती होती. हा सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र टी.व्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्विनी मनवर यांनी केले तर आभार सुधाकर मेश्राम यांनी मानले.