छत्रपती संभाजीनगर, नोकरीच्या पगारातील हाती येणारे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी व उतारवयात औषध-पाण्याला कामी यावेत म्हणून अनेक जण ही पुंजी बँकेत ठेवतात. त्यावरच पुढे सारे काही व्यवहार अवलंबून असतात. मात्र, शहरातील खाजगी संस्थेत काम करणारे शिक्षक दांपत्याने आपल्या मुलांच्या उच्चशिक्षणासाठी व आयुष्यात कामी येणारी पुंजी वृद्धाश्रम उभारण्यासाठी लावली आहे. या शिक्षक दांपत्यांना याकामी त्यांची मुले ऋत्विक आणि गौरव,भावांचा पाठिंबा आहे, हे विशेष.
वृद्धाश्रमासाठी जागा भाड्याने घेतली
रामदास वाघमारे हे 13 जून 1997 मध्ये छत्रपती प्राथमिक विद्यालय गारखेडा या शाळेत रुजू झाले. आपल्या सेवाकाळात 2015 मध्ये त्यांनी ‘ एनजीओ बी.टी.ई. फाऊंडेशन’, औरंगाबादची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत वंचित दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी गेली आठ वर्ष अविरतपणे काम करत आहेत हे काम करत असतानाच या शिक्षक दांपत्यांच्या असे निदर्शनात आले की ‘वृद्धाश्रमाची’ अत्यंत गरज आहे. आपल्याला आईवडीलांची सेवा तर करायला मिळाली नाही.वाघमारेंच्या वडिलांचे छत्र बालपणीच हरवल्यामुळे आईने काबाड कष्ट करून लहानाचे मोठे केले.शहरातील खाजगी संस्थेत विनापगारी काम करत असताना आईची सेवा करता आली नाही. हे दुःख मनमोहन बोचत होते. 2010 मध्ये पगार सुरू झाला.त्या आधीच 2009 मध्ये आईचे छत्र हरवले.यानिमित्ताने तरी आई-वडिलांची सेवा करायला मिळेल हा या मागचा निवळ हेतूने वाघमारेंनी ‘माई वृद्धाश्रम’ सुरू केले. मुकुंदवाडी भाजी मार्केट परिसर येथे वृद्धाश्रमासाठी जागा भाड्याने घेतली.
असा आहे वृद्धाश्रम
चाळिसीच्या वरील चार दांपत्यांची (आठ रहिवासी कर्मचारी) नेमणूक करण्यात येणार आहे. येथेच एक रूम व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत. 30 बाय 25 चा हॉल, 20 बाय 15 चे किचन, पाच मोठ्या खोल्या, बेड, गाद्या, इतर कामांसाठी दोन खोल्या आहेत. यासह चार बाथरूम, चार स्वच्छतागृहे, गोडावून, पार्किंगची सोय आहे. वृद्धांना योगासाठी टेरेस वर मोठे दोन हॉल आहेत. 40 बाय 30 स्क्वेअर फूट जागा टेरेसवर मोकळी आहे. सोलरची व्यवस्था आहे. वृध्दाश्रमाच्या समोर भव्य साई श्रद्धा गार्डन आहे.
म्हणून वृद्धाश्रमाचा निर्णय
■ वाघमारे यांच्या आईच्या स्मरणार्थ “माई वृद्धाश्रम” सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे वाघमारे सांगतात. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत आजारी, वयोवृद्ध माणसांना आधार असायचा. दवा पाण्याची सोय व्हायची, आताच्या विभक्त कुटुंब, शहरीकरणाची ओढ, करिअरला महत्त्व देत असल्याने पाल्यांकडे वयस्क लोकांसाठी वेळ नाही. वृद्धाश्रमात ‘वृद्धांची’ काळजी घेतल्या जाते. पूर्वी पैसा कमी आत्मीयता जास्त होती. आता याच्या उलट आहे. सध्या देशात वृद्धांची संख्या आठ टक्के आहे, पुढे हा आकडा दहा टक्क्यांपर्यंत जाईल. त्यामुळेच वृद्धाश्रमाची गरज वाढत असल्याचे वाघमारे यांचे म्हणणे आहे.
- रामदास वाघमारे ( अध्यक्ष, एनजीओ बी. टी.ई. फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर)
संपर्क: 8888125610
वाघमारेंचा औरंगाबादपर्यंतचा प्रवास
■ रामदास वाघमारे हे मूळचे घनसावंगी तालुक्यातील साकळगाव येथील आहेत. त्यांचा जन्म साकळगाव (ता. घनसावंगी जि. जालना) या गावी बालपण आणि शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत केले. पुढे छत्रपती संभाजीनगरातील खोकडपुरा येथील श्री शिवाजी हायस्कूल पाचवी ते नववीपर्यंत पुढे दहावी चिकलठाणा येथील न्यू हायस्कूल येथे दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. अकरावी बारावी देवगिरी कॉलेज, पदवी व एम. ए. विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) याठिकाणी झाले. वाघमारे यांची छत्रपती प्राथमिक विद्यालय गारखेडा परिसर येथील खासगी संस्थेत सहशिक्षक म्हणून तर त्यांच्या पत्नी सौ.मीरा अचलखांब संत कबीर प्राथमिक विद्यालय नक्षत्रवाडी येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. हे दोन्ही शिक्षकदापंत्य आपली नोकरी सांभाळून राज्यभर वंचित दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी जीनियस कार्य करत आहेत. गेल्या आठ वर्षापासून एनजीओ बी.टी.ई. फाउंडेशनच्या माध्यमातून, ‘वीट भट्टी कामगारांच्या मुलांना, ऊसतोड कामगारांच्या मुलांना तसेच वंचित दुर्बल घटकातील मुला मुलींना शाळेच्या प्रवाहात आणण्याचे कार्य हे शिक्षक दांपत्य करत आहेत. हे कार्य करत असतानाच वाघमारे दापंत्यांच्या असे लक्षात आले की वाघमारेंच्या ‘आईच्या स्मरणार्थ’ ‘माई वृद्धाश्रम’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
■ वृद्धाश्रमात २० जणांच्या राहण्याची सोय आहे.
वृद्धाश्रमात जाती- धर्माचे बंधन नाही.
वृद्धाश्रमात निःशुल्क नोंदणी असेल, कुणी पेन्शनर्स योगदान देणार असेल तर ते स्वीकारले जाईल.
२४ तास नर्सिंगची सुविधा असेल. ट्रस्टतर्फे मेडिकल कैंप,माजी सैनिकांचा सत्कार, दानदात्यांचा सत्कार, समाजसेवकांचा सत्कार, पत्रकारांचा सत्कार, शैक्षणिक साहित्यिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आदी उपक्रम राबविले जातात.