तलवाडा ( प्रतिनिधी ) डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्रातील शाखा अध्यक्ष ते राजाध्यक्ष यांचे राज्यस्तरीय कार्यकर्ता महाधिवेशन शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी सायंकाळी ठिक चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष – शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे होणार असून या महाधिवेशनास गेवराई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिपीआयचे बीड जिल्हा उपाध्यक्ष मदन हातागळे यांनी केले आहे.
पुणे येथे शुक्रवारी होणाऱ्या या महाधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डिपीआयचे संस्थापक अध्यक्ष – प्रा.सुकुमार कांबळे व उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष – शरदचंद्रजी पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा ज्येष्ठ विचारवंत – पद्मश्री लक्ष्मण माने हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून डिपीआयचे अजिंक्यभैय्या चांदणे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे महाधिवेशन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, पुणे – सातारा रोड, पद्मावती पुणे याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी ठिक ४ वाजता होणार आहे. तरी या भव्यदिव्य महाधिवेशन कार्यक्रमास गेवराई तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील मदन हातागळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
Home Uncategorized पुणे येथील डिपीआयच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता महाधिवेशनास उपस्थित रहा – मदन हातागळे