शेतकर्यांची वाघीण पालकमंत्र्याला तोंडावरच म्हणाली, तुमचं काळ तोंड आज दिसल..!
गेवराई दि. 1 : वार्ताहर :एक शेतकरी कन्या पोटतिडीकीने शेतीचे प्रश्न मांडून आवाज उठवत असेल तर, पालकमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक संवाद साधून व्यथा ऐकून घ्यावी, एवढीच माफक अपेक्षा असते. परतू , बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांचा “इगो” महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बीड च्या शेतकर्यांना दिसला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी नीतिमत्तेचेधडे दिले. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या नेत्या पुजा मोरे
यांनी ना. सावे यांना निवेदन दिले. त्यावेळी त्या म्हणाल्या,
सर, तुम्ही शेतकर्यांच्या संदर्भात
नीट वागले असते तर तुम्हाला भेटायला आम्हाला एवढे कष्ट घ्यावे लागले नसते. सर , आज दिसले तुम्ही काळे की गोरे..!यानंतर, पालकमंत्री चिडले आणि निवेदन हिसकावत, ठीक आहे. चांगलय, चला. अशा गुर्मीत त्यांनी तिथून काढता पाय घेतला. दरम्यान,
1 मे. रोजी दुपारी ना. सावे यांनी गेवराई तालुक्यातील शेती नुकसानीची पहाणी केली. या आधी ही बीड जिल्ह्य़ात, अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र, पालकमंत्री असंवेदनशील असल्याची नागरीकांची भावना झाली असून, शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करून, पालकमंत्री हरवल्याची जाहिरात केली होती. सदरील पोस्टर्स महाराष्ट्रात व्हायरल झाले होते. त्यामुळे,
कु. पुजा मोरे यांना सोमवारी, सकाळी सहा वाजता तलवडा ता. गेवराई येथून पोलीसांनी ताब्यात घेतले होते. गारपिटीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परंतू
एकदाही पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्याला तोंड दाखवलेले नाही. त्यामुळे “आवकाळीने धुमाकुळ घातला आहे.बीड जिल्ह्यातील आमदारांचे फोन पालकमंत्री उचलत
असतील तर या…म्हणाव त्यांना गारपीट भागात दर्शन द्यायला. चांगला सत्कार करू त्यांचा” या आशयाची फेसबुक पोस्ट करत पालकमंत्र्यांना इशारा दिला होता. त्या पोस्टरचा पालकमंत्र्यांना राग आला. मात्र, पालकत्वाचा त्यांना विसर पडला, अशी चर्चा होत आहे.