अंकलखोप प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ सांगली जिल्हा अध्यक्ष आदरणीय जयवंत सूर्यवंशी (तात्या)यांचे वडील सुप्रसिद्ध शाहीर लोककलेचे प्रणेते शाहीर आनंदराव केशव सूर्यवंशी (आण्णा)राहणार अंकलखोप जिल्हा सांगली यांचा जन्म शताब्दी सोहळा आशीर्वाद मंगल कार्यालय अंकलखोप या ठिकाणी पार पडला आजपर्यंत भारतातील तीन राष्ट्रपतीं, पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्री यांच्या समोर आपली कला सादर करण्याचे, प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या परेड दरम्यान महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे.असे भाग्य लाभलेले आदरणीय अण्णा यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांची ग्रंथ तुला करण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याही वयात आवाजातील जरब, पोवाडा लोकगीते सादर करण्याची लकब पाहता 1923 साली जन्म झालेले अण्णा त्यांची तब्येत आणि आवाज ही त्यांना मिळालेली दैवी देणगी आहे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आज समाजाचे पदाधिकारी म्हणून *मी आणि प्रा. सोमनाथ साळुंखे, विनोद कदम,वज्रधारी न्यूजचे दत्ता खंडागळे, बाबा वाघमारे,आर.के.रोकडे,ॲड.सतीश लोखंडे, नितीन खंडागळे, महामंडळाचे पदाधिकारी, अण्णांचे अनेक शिष्य नामवंत शाहीर, लोक कलाकार, स्थानिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत मंडळी यांच्या उपस्थितीत अण्णांचा जन्मशताब्दी सोहळा पार पडला.
मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की अण्णांच्या या सोहळ्यात मला सहभागी होत आले इतकेच नाही तर *मला अभिमान आहे की अण्णांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात त्यांच्या कलेच्या माध्यमातून नाभिक समाजाची मान ताठ केलेली आहे. अण्णा म्हणजे फक्त सांगली जिल्ह्याचे भूषण नसून संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण आहे आणि नाभिक समाजाच्या इतिहासातील सुवर्णपान आहे . स्वतःची कला जोपासताना कै. गोपाळ बापू सूर्यवंशी या आपल्या मुलाला आपला वारसा दिला. आण्णांनी आणि गोपाळ बापूंनी अनेक सरकारी योजनांच्या जाहिराती केल्या, महाराष्ट्रातील *लोक कलाकारांना सरकारी मानधन मिळवून दिले आजही त्यांच्या मनोगतातून त्यांच्या कुटुंबावर असलेले प्रेम आणि कला आणि कलाकारांच्या बद्दल असलेले प्रेम हे प्रत्येक शब्दात जाणवत होते *याही वयात त्यांनी एक लोकगीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
इतकेच नाही तर समाज संघटनेचे संस्कार त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये पेरले, त्याचाच परिणाम आज आ. जयवंत आनंदराव सूर्यवंशी तात्या हे महाराष्ट्र नाभिक महामंडळ सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत. एक आदर्श व्यवसायिक आणि आदर्श नोकरदार, आणि आदर्श शेतकरी या सर्व गोष्टी या कुटुंबामध्ये बघायला मिळतात हे त्यांच्याच संस्काराचे फलित आहे.
आदरणीय अण्णांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी अण्णांच्या इथून पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करताना इतकच सांगेन शेवटच्या क्षणापर्यंत अण्णा तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी असाल यामध्ये काडीची शंका नाही किंबहुना परमेश्वराला या तिन्ही गोष्टी कधीही तुमच्याकडून घेता येणार नाहीत त्या नेहमी तुमच्या सोबत असतील हे आजही तुमच्या सतप्रवृत्तीतून दिसून आले.