गेवराई तालुका कारागीरची औद्योगिक सहकारी संस्थाचे चेअरमनपदी सुनील पोपळे तर व्हॉइस चेअरमनपदी सुमित्रा थोरात यांची बिनविरोध निवड

0
678

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुका कारागिरांची( बारा बलुतेदार ) औद्योगिक सहकारी संस्था चेअरमनपदी सुनील पोपळे तर व्हॉइस चेअरमनपदी सुमित्रा थोरात यांची बिनविरोध निवड झाली. सदर माहिती अशी की निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस.एस. कदम यांनी गेवराई तालुका कारागिरांची औद्योगिक सहकारी संस्थांच्या निवडणुक बिनविरोध पार पडली यांमध्ये सर्वांना मते सर्व संचालक मंडळाच्या नियुक्ती करण्यात आले आहेत. सर्वसाधारण कारागीर म्हणून सय्यद गौस मोहीयोदिन स. जैतुल अवियोदिन, पोपळे सुनील ज्ञानोबा, थोरात रघुनाथ कुशाबा, मस्के रघुचंद्र लक्ष्‍मणराव, पंडित जगन्नाथ बन्सी, सोनवणे सदाशिव किसन, तसेच महिला प्रतिनिधी म्हणून थोरात सुमित्रा नाना, मस्के विमल लक्ष्मणराव तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी म्हणून सौरदमल विजय अश्रुबा तसेच भटक्या विमुक्त जाती -जमाती विशेष मागास प्रवर्ग यामधून वैराग पद्मराज गुलाबराव, आणि इतर मागासवर्ग भुते गणेश शंकरराव यांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीने सर्वत्र अभिनंदन आता वर्षा सर्व नवनिर्वाचित अध्यक्षसह संचालक मंडळाचे निवडणूक अधिकारी श्रीमती एस एस कदम संस्थेचे सचिव गलांडे यांनी अभिनंदन केले .या निवडीबद्दल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here