गेवराई प्रतिनिधी
पंचाहातर क्विंटल कापसाने भरलेला आयशर टॅम्पो दारातून चोरुन नेल्याची घटना घड्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटने संदर्भात सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाणे हदितील तांदळा गावी एका किराणा दुकानदाराचा, स्वतःच्याच घरा समोर कापसाने भरलेला आयशर टॅम्पो आज्ञात चोरट्याने चोरुण नेल्याची घटना दि 7 रोजी घडली आहे. महेश बद्रीनाथ धांडे वय 26 रा तांदळा ता गेवराई जि बीड याने आपल्या जवळील 75 कुंटल कापुस विक्रीसाठी नेण्या करीता आयशर टॅम्पो क्रं .एम , एच , 42 बी 7871 या मधे कापुस भरुण घरा समोर उभा केला होता. दि 6 रात्री अज्ञात चोरट्याने 75 कुंटल कापुस अंदाजे की 6 लाख व टॅम्पो कि 4 लाख एकुन दहा लाख रु मुदेमाल चोरी गेला आहे. या प्रकरणी चंकलबा पोलीस ठाण्यात दि 7 रोजी आज्ञात चोचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढिल तपास पोहे तांदळे करत आहेत.