गेवराई (शुभम घोडके )मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल महाविद्यालय व टाटा कन्सल्टी सर्विसेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युथ एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग चे आयोजन २० जून २०२३ नंतर केले जाणार आहे. महाविद्यालयामध्ये सलग तीन वर्ष टीसीएस ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण होऊन ३९ विद्यार्थ्यांची टीसीएस पुणे व बेंगलोर येथे निवड झालेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी हे ट्रेनिंग आयोजित केले जाणार आहे. सदर ट्रेनिंग साठी महाविद्यालयातून बीए, बीएस्सी, बीकॉम पदवी प्राप्त, नियमित शिक्षण दहावी ते पदवी मध्ये ६० टक्के पेक्षा अधिक गुण असावेत व एक वर्षापेक्षा अधिक गॅप (Gap) नसलेले विद्यार्थी पात्र आहेत.
हे ९० तासाचे ट्रेनिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड होईल व ज्या विद्यार्थ्यांना दहावी ते पदवी या कालावधीत ६० टक्के पेक्षा कमी गुण असतील त्यांची ट्रेनिंग नंतर लेखी परीक्षा व मुलाखती द्वारे निवड होईल.
इच्छुक विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलमध्ये प्रा. हनमंत हेळंबे यांच्याकडे दि. ११ एप्रील २०२३ पर्यंत नाव नोंदणी करावी असे आव्हान महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. हनमंत हेळंबे व प्रभारी प्राचार्य प्रो. विजय सांगळे यांनी केले आहे.