गेवराई,(प्रतिनिधी)-
भारत देशातील नंबर एकची प्रयोगशाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या “मेट्रो पॉलिस”पॅथॉलॉजी स्पेशालिस्टच्या शाखेचा शुभारंभ शुक्रवार, दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरील ढोराज हॉस्पिटलजवळ डॉक्टर मोमीन अब्दुल रौफ ढोराज यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.जगदीश पोतदार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सर्वोत्तम शिंदे, डॉ.शेख इकबाल, ज्येष्ठ पत्रकार काझी अमान, पत्रकार अय्युब बागवान, प्रा.राजेंद्र बरकसे, डॉ.मयूर हारकुट, डॉ.विशाल पवार, डॉ.सय्यद मुख्तार, डॉ.शेख सिराज, डॉ.एम.ए.खालेक, पत्रकार सय्यद कौसर, पत्रकार शेख हारून, डॉ.धनंजय माने डॉ.गणेश काकडे, शेख मन्सूरभाऊ, गोविंद भुतडा ,नगरसेवक भरत गायकवाड,ॲड. विलास सुतार आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. प्रारंभी “मेट्रो पॉलिस”पॅथॉलॉजी स्पेशालिस्टचे लॅब टेक्निशियन शेख अलीम इसहाक, शेख अबूतलहा तय्यब व शेख जमीलभाई यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास शेख अय्युब सय्यद मुस्तकीम, शेख चांद, शेख रियाज, शेख तय्यब, शेख मुर्तुजा, शेख फेरोज, शेख अरबाज, सय्यद आरेफ, मुहम्मद इमरान, मुहम्मद अली, शेख मुआज, सय्यद नदीम, सय्यद नजीर, सय्यद सलीम, सय्यद युसूफ अहमद, शेख अबूबक्र, शेख राजू रियाज, शेख नवीद, शेख अल्ताफभाई यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते.
भारत देशातील नंबर एकची प्रयोगशाळा असलेल्या “मेट्रो पॉलिस” पॅथॉलॉजी स्पेशालिस्ट या प्रयोग शाळेच्या गेवराईतील शाखेमार्फत थायरॉईड, कॅन्सर, लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन, लिव्हर फंक्शन, एचबीए-१ सी आदी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या व सर्व प्रकारचे रोग निदान आत्याधुनिक पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती लॅब टेक्निशियन शेख अलीम व शेख अबूतलहा यांनी यावेळी दिली.