मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश कदम यांची निवड

0
146

आष्टी। प्रतिनिधी
राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, कार्याच्या व‌ प्रसिद्धी पासून कोसो दूर असलेल्या वंचित घटकाला दैनिक लोकमत व दै.मराठवाडा साथी या वृत्तपत्र व‌ आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक जोपासना करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे दैनिक लोकमतचे आष्टी तालुका प्रतिनिधी तथा आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कदम यांची मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख,राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, विभागीय समन्वयक सुभाष चौरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे
यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. संघटनेच्या ध्येय धोरणाच्या अधीन राहून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने मागील अनेक वर्षापासून ते प्रयत्न करत असून त्यांनी मागील काळातही जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा जिल्हा उपाध्यक्ष पदाची संधी मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, राज्याध्यक्ष शरद पाबळे,राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, डिजीटल मिडीया राज्य प्रमुख अनिल वाघमारे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे,बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंखे, पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा निमंत्रक सुहास अधोडे, विलास डोळसे,डिजिटल मिडिया जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाठ व बीड,आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील पत्रकार बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here