नांद्रा प्र.लो येथे श्रीराम नवमी निमित्त 34 दात्यांनी रक्तदान शिबिर रक्तदान

0
129

सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह यांचा स्तुत्य उपक्रम

ज्युनिअर चार्ली चाँप्लीन समाजसेवक सुमित पंडित यांनी केली रक्तदानाविषयी जनजागृती

औरंगाबाद प्रतिनिधी
दि.३०/०३/२०२३
नांद्रा प्र लो ता. जामनेर जि.जळगाव येथे श्रीराम नवमी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे हे पाचवे वर्ष होते, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तरुणांनी मोठा उत्साह दाखवून भीती न बाळगता स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळेस गावातील तरुणांना रक्तदानाचे महत्त्व,ज्युनिअर चार्ली चाँप्लीन समाजसेवक सुमित पंडित यांना आपल्या मुखभिनयातु नागरिकांना पटवून दिले.
त्याचबरोबर सर्वांचे प्रेरणास्थान,आधारस्तंभ कै.डॉ आधार पाटील यांना माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून चालू केलेले रक्तदान शिबिर घेऊन,आपले बहुमूल्य रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचतील हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल असे सांगितले. समाजसेवक सुमित पंडित यांनी चार्ली चॅप्लिन ची भूमिका करून त्या ठिकाणी रक्तदान श्रेष्ठदान हे पटवून दिले व तरुणांमध्ये रक्तदानाविषयीची भीती दूर करून उत्साह वाढविला.रक्तदानाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक वामन पाटील,रघुनाथ पाटील, सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित,किशोर शिंनकर,यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळेस गावातील तरुण ३४ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.यामध्ये मोहन कुराडे,अनिल पाटील,रामेश्वर कुराडे,चेतन पाटील,सुनील पाटील,गणेश मोरे, नरेंद्र पाटील,चेतन पाटील,भारत कोळी,धीरज तायडे,शुभम कोळी,राहुल सोनवणे,सचिन पाटील,ज्ञानेश्वर पाटील,उमेश कुराडे,भूषण पाटील,अक्षय पाटील,पंकज पाटील,आशिष पाटील,इलियास पटवे,पदमाकर पाटील,विश्वजीत गुजर,धर्मराज पाटील,विलास तायडे,संजय पाटील,हितेंद्र पाटील,नितेश पाटील,डॉक्टर हर्षल पाटील,
सागर पाटील, मधुकर पाटील,
ज्ञानेश्वर पाटील,विनोद पाटील,
पद्माकर पाटील,आदिंनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वीते साठी माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हा अध्यक्ष गजानन क्षीरसागर सुनील पाटील,दिवाकर पाटील. प्रकाश पाटील,भगवान पाटील, प्रेमराज सोन्ने,वामन पाटील,
रघुनाथ पाटील,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,माणुसकी समुहाचे सभासद आणि इतर अनेक गावकरी मंडळी नांद्रा प्र लो यांनी परिश्रम घेतले.व रामनवमी निमित्ताने महाप्रसादाने देखील आयोजन करण्यात आले होते.रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here