गेवराई प्रतिनिधी
शहरात जुन्या बसस्थानक परिसरात असणाऱ्या गोळ्या- बिस्कीट च्या दुकानदाराच्या घरी पोलीसांनी छापा टाकुन दहा लाखाचा गुटखा जप्त करून, पोलीसांनी धडक कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
या संबधी सविस्तर माहिती अशी की गेवराई शहरात किराणा दुकानदार आपल्या घरात गुटखा आनुन विक्री करत असल्याची माहिती गुप्त सुत्रा मार्फत पोलीसांना मीळाली त्यानुसार पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या मार्ग दर्षनाखाली साह्यक पोलीस अधिक्षक धिरज कुमार यांच्या सह टिमने सापळा रचुन दि 31 रोजी दुकान दाराच्या गजानन नगर भागातील घरी जावुन छापा टाकला या कारवाईत 10 लक्ष 48 हजार रु किमतीचा आवैध गुटखा हस्तगत केला आहे या प्रकरणी फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे यांच्या फिर्यादीवरून १ ) फसियोद्दीन अब्दुल करीम वय 34 वर्ष राहणार गजानन नगर , २ ) शेख जावेद उर्फ बाबू शेख बशीर राहणार मोमीनपुरा बीड , ३ ) सचिन गुप्ता राहणार संभाजीनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती , ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर , धीरज कुमार , उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहाय्यक पोलीस निलेश इधाटे , पोना अशोक नाददास , पोका १०६६ गणेश नवले , पोका १५१० युवराज चव्हाण , पोका ६६१ तुकाराम कानतोडे यांनी केली . आहे कारवाईतील सर्व हस्तगत केलेला गुटखा पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.