गेवराई प्रतिनिधी
गेवराई येथील गुरुकुल इंग्लिश स्कूल आणि प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल रंगार चौक येथे बाल चिमुकल्यांनी श्रीराम जन्म महोत्सव उत्साहात साजरा केला श्रीराम नवमी निमित्त प्रभू श्रीराम यांचा जन्म महोत्सव गुरुकुल मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करताना बाल चिमुकल्यांनी वेश भूषा परिधान करून श्रीराम जन्म महोत्सव पाळणा गायला रावणाने सीतेचे अपहरण केलेली नाटिका बाल चिमुकल्यांनी सादर केली श्रीराम यांची वेशभूषा राजवीर ढोणे श्री लक्ष्मण यांची वेशभूषा अथर्व बेदरे सीतेची वेशभूषा आणन्या बेद्रे कैई कैई यांची वेशभूषा समृद्धी तपासे शबरी यांची वेश भूषा ज्ञानेश्वरी गवारे रावण यांची वेश भूषा रितेश नलवडे या बाल विद्यार्थ्यांनी साकारली व श्रीराम प्रभू यांचे सैन्य म्हणून सोळंक म्हेत्रे . जान्हवी मोटे. अंकिता कानपुरे .श्रुती वादे. हजारे स्वराज. श्रीकांत आतकरे. अविनाश दाभाडे
बनसोडे यश. वादे युवराज .अजिंक्य पवार .किंजल शिंदे. या बाल चिमुकल्यांनी वेगवेगळी वेश भूषा परिधान करून श्रीराम नवमी निमित्त जन्म महोत्सव साजरा केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी मोटे आश्विनी झेंडेकर स्कूलच्या प्राचार्य. सौ. अरुणा ठाकर यांनी सर्व बाल चिमुकल्यांचे आभार मानले व कौतुक केले