नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
नांदेड: दिनांक 16 मार्च रोज गुरुवार रोजी कैलासनगर नांदेड येथील जिवन साधना फॅशन डिजाईन इन्स्टिट्यूट मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यीनींना भारत सरकारच्या अंगीकृत असलेल्या निडको या संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख नागनाथ महादापुरे यांनी ईडबी, निडको, उद्यमीबाजार यांच्या योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच महिलांना चुल व मुल यांच्या बाहेर पडुन आत्मनिर्भर बनुन व्यवसायाचे शिखर कसे गाठता येउ शकते याबाबत सखोलपणे सांगितले.
यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यासाठी त्याग, समर्पण, मेहनत, सातत्य, सकारात्मकता यांचा अंगिकार केल्यास यश नक्कीच मिळते याबाबत अनेक उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी जिवन साधना महिला मंडळ चे सर्वेसर्वा एकनाथ संगनवार यांनी प्रस्तावना मध्ये संस्थेच्या कार्याची स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. शेकडो महिलांना आत्मनिर्भर बनवून ते यशस्वीपणे व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत व इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देत आहेत अशी माहिती सांगितली.
याप्रसंगी नवभारत युवा संघाचे राज्य प्रमुख समाजभूषण लवकश जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी कराटे प्रशिक्षण विषयी लवकुश जाधव यांनी उपस्थित सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुभाष पाटील (चिद्रावार) यांनी केले.
जिवन साधना फॅशन डिजाईन इन्स्टिट्यूट मध्ये चांगला कार्यक्रम घडवुन आणल्याबद्दल संस्थेचे सर्वेसर्वा एकनाथ संगनवार यांचे विद्यार्थीनींनी आभार मानले.
तसेच कमी वेळात सुंदर व यशस्वी मार्गदर्शन केल्याबद्दल नागनाथ महादापुरे यांचे उपस्थित विद्यार्थीनींनी आभार मानून आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सहकारी सुभाष पाटील (चिद्रावार) व विद्यार्थ्यीनींनी अथक परिश्रम घेतले.