कवी, साहित्यिक आणि सिने-नाट्य कलावंत यांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा पहिला राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार वितरण सोहळा…!

0
77

मुंबई, महाराष्ट्र (लालबाग-परळ-प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे प्रथमच “राष्ट्रीय लघुपट महोत्सवा” चे आयोजन करण्यात आले होते. या लघुचित्रपट महोत्सवमध्ये भारतातील जवळजवळ ८७ अनेक भाषिक लघुचित्रपटांनी सहभाग घेतला होता. त्यातील परीक्षकांमार्फत निवडलेल्या २७ लघुचित्रपटांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून त्यातून अंतिम टप्यात ४ उत्कृष्ट लघुपटांची निवड करण्यात आली असून काही वैयक्तिक पारितोषिकं काढण्यात आलेली आहेत. निवड झालेल्या ४ लघुचित्रपटांचे सादरीकरण हे दुपारी ३.१५ च्या सुमारास होणारआहॆ आणि त्याचा पुरस्कार वितरण सोहळा सायंकाळी ६.०० च्या सुमारास रविवार दिनांक २६ मार्च, रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास डॉ.शिरोडकर हायस्कूल, शिशु विकास मिनी हॉल, डॉ.ई.बोर्जेस रोड, ग्लोबल हॉस्पिटल समोर, परेल, मुंबई १२ या ठिकाणी संपन्न होणार आहॆ. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध कवी सन्मा. अरुण म्हात्रे, कुटुंब रंगलंय काव्यात फेम प्रा. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध अभिनेता संजय खापरे, चला हवा येऊ दया फेम अंकुर वाढवे, हास्य जत्रा फेम प्रभाकर मोरे, अभिनेता मकरंद पाध्ये, अभिनेते विलास (बाळा) चौकेकर, रात्रीस खेळ चाले फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता वाडये, संजीवनी पाटील, अभिनेत्री सिद्धी कामथ, समाजसेवक खलील शिरगांवकर, दिग्दर्शक सुहास कर्णेकर, फिल्म क्राफ्ट फेडरेशनचे सरचिटणीस दिलीप दळवी, निर्मिती फिल्म क्लबचे अध्यक्ष अनिल म्हमाने, निवेदक अमन दळवी, अभिनेता-दिग्दर्शक अनंत सुतार, अभिनेता सुरेश डाळे, ग्राफिक डिझायनर मनिष व्हटकर, उद्योगपती अजीत शाह, जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल वंजारे, तसेच साहित्यिक, पत्रकार तसेच सिने-नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलावंत हे प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित राहणार आहेत. संपुर्ण सोहळ्याची निवेदनाची म्हणजे जमेची बाजू फणी आणि गाणी फेम शशिकांत खानविलकर हे साकारणार असून याप्रसंगी विजेत्या लघुचित्रपटाना प्रतिष्ठित मान्यवरांच्या शुभहस्ते रोख रक्कम आणि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. असे कार्यक्रम संयोजक महेश्वर तेटांबे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.

कार्यक्रम संयोजक
आर्यारवी एंटरटेनमेंट
९०८२२९३८६७
८८७९८१०२९८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here