बीड ( प्रतिनिधी) प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी गारा वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या राणी गायकवाड यांनी दिला आहे मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला असताना ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.अनेक जिल्ह्यासह बीड जिल्ह्यात ही अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस बरसत आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे
सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसला आहे. याशिवाय ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह गारा सह अवकाळी पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. अवकाळी पावसामुळं कांदा, मका व भाजीपाल्यांच्या पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या राणी गायकवाड यांनी प्रसदी पत्रकाद्वारे दिला आहे