शुभम घोडके/गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी) सध्या लहान मुलं – मुली मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. विविध प्रकारच्या व्हिडीओंच्या माध्यमातून ते कायम आपल्याला मनोरंजन करत असताना त्याच्या या व्हिडीओंची खूपच चर्चा होत असते. यावेळी तहसील रोड या परिसरातील कु.मयुरी महेंद्र जवंजाळ यांनी कन्या जवंजाळ देखील असाच एक गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो पुष्षा चित्रपटातील सुपरहिट डायलॉग “मै झुकेगा नहीं” यावर लिपसिंक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय बनला असूनहा व्हिडिओ खूप मजेशीर आहे. महत्वाची बाब म्हणजे पुष्पा स्टाईल ती दिसत आहे. या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. तसेच हा व्हिडिओ फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.तहसील परिसरातील अंगणवाडी येथे शालेय शिक्षण ती सध्या घेत आहे अतिशय लहान वयापासून तिला इंग्रजी महिने ,मराठी महिने पूर्ण मुखपाट आहेत परिवारातील सदस्यांचे मोबाईल नंबर पाठ आहेत हिंदी आणि मराठी गाणी शालेय कविता यासह तिला पाठ आहे अशा लहान वयात मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच म्हणावे लागेल मयुरीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.