लोकसेवा विकास महिला आघाडीचा मनोरंजनातून मनोजागरण उपक्रम स्तुत्य; डॉ.सुधा कांकरिया

0
62

शौकतभाई शेख
श्रीरामपूर – मुलींची संख्या घटली असून त्यामुळे असमतोल निर्माण झाला आहे. यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. समाजाने आता मानसिकता बदलवली पाहिजे आणि स्ञी भ्रुणहत्या थांबवून स्ञी जन्माचे स्वागत केले पाहिजे. लोकसेवा विकास महिला आघाडीने “खेळ पैठणीचा” व्दारे मनोरंजन करतानाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करुन मनोजागरण साध्य केल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सौ.सुधा कांकरिया यांनी केले. उपस्थितांना संबोधताना त्यांनी स्ञी भ्रुणहहत्या व मुलीच्या जन्माचे स्वागत याबाबत सविस्तर विवेचन केले.
लोकसेवा विकास महिला आघाडीने उत्सव मंगल कार्यालयात माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त “खेळ पैठणीचा” तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांना पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ.कांकरिया बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.सौ.वर्षा शिरसाठ होत्या तर माजी आ.भानुदास मुरकुटे, सौ.मंजुश्री मुरकुटे, सौ.पल्लवी डावखर, सौ.सुनिताताई गायकवाड, सौ.श्रध्दा मिरीकर, सौ. शालिनीताई कोलते, सौ.शितल गवारे, सौ.स्मिता पाटील, सौ. मृणाल धनवटे आदि प्रमुख उपस्थित होते.
माजी आ.भानुदास मुरकुटे म्हणाले की, माझ्या कुटुंबात स्ञी भ्रुणहत्या कधीच झाली नाही. मला चार नाती तर दोन नातू आहेत. समाजानेही स्ञी भ्रुणहत्या करु नये, तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष डॉ.सौ.वर्षा शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले.
लोकसेवा विकास महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ.मंजुश्री मुरकुटे स्वागत व प्रास्तविक करताना म्हणाल्या की, लोकसेवा विकास आघाडीने मनोरंजनातून प्रबोधन या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले. भविष्यात विविध स्पर्धा, व्यक्तीमत्व विकास, मनोरंजनपर कार्यक्रम, क्रिडा व कला स्पर्धा, आरोग्य-योग व व्यायाम शिबीरे असे उपक्रम राबविण्याचा मनोदय आहे. सचिव सौ.पल्लवी डावखर यांनी आभार मानले. सौ.राखी सुरडकर व सौ.प्रतिभा तागड यांनी सूञसंचलन केले. सौ.सायली रासने यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सुचनेस सौ.पायल सुराणा यांनी अनुमोदन दिले.
यावेळी डॉ.सौ.ज्योति भळगट व सौ.आशा परदेशी (सामाजिक), सौ.सुजाता मालपाठक (शैक्षणिक ), डॉ.सौ.गुंफा कोकाटे (साहित्यिक), डॉ.सौ.वर्षाताई शिरसाठ (वैद्यकीय), कु.तीर्था तांबे (उद्योजक), सौ.कलावती देशामुख (कला), डॉ.सौ.सुचिता भट्टड (क्रीडा) आदिं विविध क्षेञातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपञ व सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. तसेच सौ.मानसी नाईक, सौ.श्वेता कुलकर्णी, सौ.तृप्ती जगदाळे, राजलक्ष्मी चव्हाण, सौ.भारती रासकर, सौ.प्रियंका पवार, तरन्नुम शेख, सौ.चंदा पवार आदिंना विशेष पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. स्नेहा कुलकर्णी, वनिता वाडेकर, राधिका ढोले, मंगल गरगट्टे, प्रियंका गवारे, राधिका करवा, वनिता आहेर, अस्मिता घोगरे आदिं महिलांसह शहरातील महिला मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. खेळ पैठणीचामध्ये सौ.सुरेखा भांड (प्रथम), सौ.सोनल चोपडा (द्वितीय), सौ.स्वाती ओहोळ (तृतिय) क्रमांक मिळवून पैठणीच्या मानकरी ठरल्या. मोनाली पिंगळे, योगिता खर्डे, श्रीलेखा राजुळे, पुजा गांधी ह्या चांदीचे करंडे तर स्नेहल लचके, किशोरी कपिले, भाग्यश्री भंडारी ह्या सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या. रियाज पठाण यांनी खेळाचे संचलन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिध्दार्थ मुरकुटे, नाना पाटील, भास्कर खंडागळे, रोहन डावखर, वैभव सुरडकर, विशाल धनवट यांचेसह कविता राजुळे, वर्षा सोलापूरकर, रुपाली गागरे, सायली रासकर, प्रिती गुंजाळ, सोनाली बनकर, सविता दरेकर, अदिती देवधर, सरिता तांबे, सविता पटारे, मधुरा कुंदे, प्रियंका राजेभोसले, सोनाली बनसोडे, मोनिका गोंडे, अनिता शिदे, मनिषा ञिभुवन, आरती डेहरे, कल्याणी वारुळे, मंदा पवार, रोमा भाटिया, सुरेखा मोरगे, राधिका देसाई, मोना हिरे, लक्ष्मी जाधव, वैशाली डोखे, सविता गुलदगड, स्वाती नाईक, रुपाली शिरसाठ आदिंनी प्रयत्न केले. कार्यक्रमास शहरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.

सौजन्य : स्वाभिमानी न्यूज नेटवर्क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here