जुनी पेन्शनच्या मागणीसाठी गेवराईत
कर्मचारी एकवटले
आज पं स च्या प्रांगणात बहुसंख्येने उपस्थित रहा — समन्वय समितीचे आवाहन

0
55

गेवराई (प्रतिनिधी) जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी विविध विभागातल्या कर्मचाऱ्यांनी राज्यात आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सहभागी होण्यासाठी गेवराई तालुक्यातील सर्व कर्मचारी एकवटले असून, आज दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात सर्व विभागाच्या पदाधिकारी व सदस्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गेवराई तालुका कर्मचारी समन्वय समितीने केले आहे.
1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना नाकारल्याने, लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. सेवानिवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे यासाठी आपल्या हक्काची पेन्शन पुन्हा सुरू करावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून सर्व विभागातील कर्मचारी करत आहेत. परंतु त्याची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घेतली नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आपला लढा तीव्र केला असून, आज दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील विविध विभागातील लाखो कर्मचारी संपावर जात आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक 13 मार्च 2023 रोजी गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात तालुका कर्मचारी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जुनी हक्क पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू आडे, मराठवाडा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिनकर शिंदे, जितेंद्र दहिफळे (तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना), नगरपरिषद कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड, अर्जुन बारगजे ( तालुकाध्यक्ष ग्रेड मुख्याध्यापक संघटना ), ए टी चव्हाण ( तालुकाध्यक्ष केंद्रप्रमुख संघटना ), रमेश हुलगे ( तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना ), अशोक डरफे (तालुका अध्यक्ष तलाठी व मंडल अधिकारी संघटना ), विष्णू जवंजाळ (आरोग्य संघटना ), सुरेश बारगजे ( प्रशासनाधिकारी पंचायत समिती गेवराई ), अंकुश राठोड ( तालुकाध्यक्ष पंचायत समिती कर्मचारी संघटना ), बाळासाहेब गावडे ( तालुकाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना ), कैलास पट्टे (तालुकाध्यक्ष शिक्षक भारती संघटना), गणेश सुळे (तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ), विशाल कुलकर्णी ( तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ), कैलास चव्हाण ( तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदर्श प्राथमिक शिक्षक समिती ), दयावान कुटे ( तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद ), अशोक राठोड (तालुका अध्यक्ष आश्रम शाळा कर्मचारी संघटना), काळम पाटील (विस्तार अधिकारी संघटना), अमोल आतकरे (तालुका अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संघटना), चोपडे सर (बांधकाम विभाग पंचायत समिती गेवराई), आघाव साहेब (विस्तार अधिकारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प पंचायत समिती ) यांनी आंदोलनाला पाठींबा देवून, पुढील दिशा आणि नियोजन याबाबत माहिती दिली. यावेळी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी, जो पर्यंत राज्य सरकार सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी उपस्थित विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केला. “एकच मिशन, जुनी पेन्शन”, “पेन्शन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची”, “कोण म्हणतं देत नाही ? घेतल्याशिवाय राहणार नाही”, अशा घोषणा देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांनी सरकार वितोधात एकीची वज्रमठ आवळली. या समन्वय समितीच्या बैठकीला शासकीय व निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here