गेवराई (प्रतिनिधी ) महाराष्ट्राची पार्श्वगायिका तथा गेवराईची सुकन्या संगीता जोशी (भावसार ) हिचे वडिल शिवाजीराव लक्ष्मणराव जोशी ( वय – ७७ वर्ष )यांचे काल दि १२ मार्च २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली – संगीता व रेखा , नातवंडे असा मोठा परिवार आहे .जोशी – भावसार कुटुंबाला झालेल्या या दुःखात बीड जिल्ह्यातील सर्व कलाकार सहभागी आहोत .