बीड / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य तथा समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सुभाष किशनराव राऊत यांची स्थायी समितीवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.१२) रोजी बैठक होऊन हे नामांकन करण्यात आले . विद्यापीठाच्या सर्व अधिकार मंडळांवर रिक्त असलेल्या व नव्याने नेमण्यात येणाऱ्या जागांची नेमणूक करणारी ही महत्त्वाची समिती आहे. ॲड. सुभाष राऊत हे गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. बीड नगरपालिकेचे सदस्य म्हणून तसेच विद्यापीठाच्या आधी सभेवर पंधरा वर्षापासून ते कार्यरत आहेत . माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते आ. छगनराव भुजबळ साहेब यांचे ते विश्वासू म्हणून ओळखले जातात. या नियुक्तीबद्दल आ. सतीश चव्हाण, डॉ. शिवाजीराव मदन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .