बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी प्रा.राजेंद्र बरकसे

0
66

गेवराई (प्रतिनिधी ) – बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीस पदी दै झुंजार नेताचे प्रतिनिधी प्रा राजेंद्र रंगनाथराव बरकसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी रविवारी ही घोषणा केली..
बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी यापुर्वीच विशाल साळुंके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिषदेने कार्याध्यक्षपदी परळीचे सतीश बियाणी, सरचिटणीसपदी गेवराईचे प्रा. राजेंद्र बरकसे, कोषाध्यक्षपदी पाटोदा येथील छगनराव मुळे आणि प्रसिध्दीप्रमूख म्हणून बीड येथील संजय हांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. राजेंद्र बरकसे हे पत्रकार, साहित्यीक, कलावंत असून कला, क्रीडा, आरोग्य ,सामाजिक, सांस्कृतिक ,संगीत आदी क्षेत्रामध्ये सक्रीय असतात . मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने त्यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली होती . जिल्हा न्यायालयाने त्यांची नुकतीच विधीदूत ( P. L. V .) नियुक्ती केली आहे . प्रा . बरकसे यांना नुकताच यशवंतरत्न राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे . अनेक पुरस्कार व गेल्या ३५ वर्षातील पत्रकारितेची दखल घेऊन परिषदेने बीड जिल्हा सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी त्यांना दिली आहे . या निवडीबद्दल
परिषदेचे विश्वस्त एस.एम देशमुख, संपादक अजितदादा वरपे, अनिल महाजन, सुनिल क्षीरसागर, पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, प्राचार्या प्रो. डॉ.रजनी शिखरे, प्राचार्य प्रो.डॉ. विजय सांगळे, योगगुरु विधिज्ञ श्रीराम लाखे, चंपावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप सोळुंके, पंकज पाटेकर, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, विनायक वझे, अविनाश बारगजे, जेष्ठ कलावंत विधिज्ञ सुभाष निकम, विष्णु खेत्रे, डॉ. सुधीर निकम, शाहीर विलास सोनवणे, प्रकाश भुते, प्रशांत रुईकर, रंजित सराटे ,अशोक कानगुडे , पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, सचिव दिनकर शिंदे, उपाध्यक्ष कैलास हादगुले , जेष्ठ पत्रकार सुभाष सुतार, अय्युब बागवान , गणेश क्षीरसागर, जुनेद बागवान ,भागवत जाधव, सखाराम शिंदे, प्रसाद कुलकर्णी , वैजिनाथ जाधव, शेख इर्शाद आदींनी नवनिर्वाचित पदाधिकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here