कुटे ग्रुपकडून वंचितांना आधार देण्याचे पवित्र कार्य
तहसीलदार सुहास हजारे यांचे प्रतिपादन; गरजुंना शिलाई मशीन, सायकलचे वाटप

0
84

बीड ः प्रतिनिधी
उद्योग क्षेत्रात एक-एक शिखर पादाक्रांत करत असतांना सामाजिक जाणीव ठेवून वंचित, उपेक्षितांना आधार देण्याचे पवित्र कार्य कुटे ग्रुपकडून केले जात आहे. बीडसारख्या जिल्ह्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणार्‍या या उद्योगसमुहाने सामाजिक कार्यातही आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सुहास हजारे यांनी केले.
द कुटे ग्रुपचे आधारवड स्व.ज्ञानोबाराव (आण्णा) नथुबाराव कुटे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ द कुटे ग्रुपचे संस्थापक सुरेशराव कुटे व मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे व आर्यन कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यात गरजु महिलांना शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांचा विमाही कुटे ग्रुप फ ाऊंडेशनच्या वतीने उतरविण्यात आला. यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात तहसीलदार हजारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संपादक, पत्रकारांसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व.ज्ञानोबाराव नथुबाराव कुटे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर द कुटे ग्रुपच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवर व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनी केले. तहसीलदार सुहास हजारे यांनी बीड जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करणार्‍या कुटे ग्रुपला शुभेच्छा देत वंचित, उपेक्षितांसाठीची ही मदत त्यांना बळ देणारी आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणा इतरांनीही घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात पत्रकारांना विमा कार्डचे वाटप, गरजु महिलांना शिलाई मशीन व विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक विनायक पुरंदरे यांच्या मुलाच्या उपचारासाठी कुटे ग्रुपच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार बालाजी तोंडे यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.पारंपारिक पद्धतीने स्वागत द कुटे ग्रुप फ फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमात उपस्थितांचे टोपी, उपरणे देवून तसेच वारकरी सांप्रदायात महत्त्व असलेला अष्टगंधाचा टिळा लावून स्वागत करण्यात आले. उपस्थित 22 महिलांना शिलाई मशीन तर 25 विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. तसेच पोस्ट ऑफि सच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांचा विमा उतरवण्यात आला.
अन् चेहर्‍यावर फु लले हस द कुटे ग्रुपच्या वतीने गरजवंत महिलांना शिलाई मशीन तर विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. ज्या महिलांवर कुटूंबाची जबाबदारी आहे, काहीतरी करण्याची जिद्द आहे, परंतु समोर आर्थिक अडचणी आहेत. अशा महिलांला शिलाई मशीन वाटप करण्यात आले. तर ज्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकलही नाही अशा विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमावेळी लाभार्थ्यांचे समाधानी चेहरे द कुटे ग्रुप फ फाऊंडेशनला धन्यवाद देत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here